MPSC मुलाखत: तुमची अधिकारी होण्याची शेवटची पायरी
मुलाखत ही तुमच्या ज्ञानापेक्षा तुमच्या प्रशासकीय दृष्टिकोनाची चाचणी असते. १०० गुणांच्या या टप्प्यात तुमचे वागणे, बोलणे आणि निर्णयक्षमता तपासली जाते.
१. 'डाफ' (DAF - Detailed Application Form) चे महत्त्व
तुमची मुलाखत तुमच्या माहिती अर्जावर आधारित असते. खालील गोष्टींवर विशेष तयारी करा:
- तुमचे नाव आणि गाव: नावाचा अर्थ आणि गावाचे ऐतिहासिक/भौगोलिक महत्त्व.
- शिक्षण: तुमच्या पदवीचा प्रशासनात कसा उपयोग होईल?
- छंद (Hobbies): छंद असावा, तो 'सांगण्यापुरता' नसावा. त्यावर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात.
२. मुलाखतीतील काही महत्त्वाचे पैलू
मुलांसाठी फॉर्मल शर्ट-पँट आणि टाय. मुलींसाठी साडी किंवा फॉर्मल ड्रेस. तुमचा पेहराव नीटनेटका असावा.
प्रश्नांची उत्तरे स्पष्ट आणि मोजक्या शब्दात द्या. खोटे बोलू नका; उत्तर माहित नसल्यास नम्रपणे 'माहित नाही' असे सांगा.
३. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Sample FAQ)
- तुमची ओळख करून द्या (Tell us about yourself).
- तुम्हाला प्रशासकीय सेवेत का यायचे आहे?
- तुमच्या जमेच्या बाजू (Strengths) आणि उणिवा (Weaknesses) कोणत्या?
- एखाद्या विशिष्ट सामाजिक समस्येवर तुम्ही अधिकारी म्हणून काय कराल? (Situation Based).