Back to Library
Strategy५ मे, २०२६
2 min read

MPSC राज्यसेवा vs संयुक्त परीक्षा (Combined): फरक, पदे आणि तुमची निवड कशी करावी?

राजराज्यसेवा VS संयुक्त परीक्षा (Combined) MPSC ची तयारी सुरू करताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ असतो की राज्यसेवा (Civil Services) करावी की संयुक्त पर...

MPSC Free Research Syllabus Vault

Reviewed against official 2026 examination criteria

राजराज्यसेवा VS संयुक्त परीक्षा (Combined)

MPSC ची तयारी सुरू करताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ असतो की राज्यसेवा (Civil Services) करावी की संयुक्त परीक्षा (Non-Gazetted)? या दोन्ही परीक्षांचे स्वरूप आणि मिळणारी पदे पूर्णपणे वेगळी आहेत.

१. मूलभूत फरक (Fundamental Differences)

वैशिष्ट्ये राज्यसेवा (Rajyaseva) संयुक्त परीक्षा (Combined)
पदांचा दर्जा Class 1 & Class 2 (Gazetted) Class 2 & Class 3 (Non-Gazetted)
मुख्य परीक्षा स्वरूप वर्णनात्मक (Descriptive/Written) वस्तुनिष्ठ (Objective/MCQ)
मुलाखत १०० गुणांची मुलाखत असते. केवळ PSI पदासाठी शारीरिक चाचणी व मुलाखत.

२. मिळणारी प्रमुख पदे (Major Posts)

  • राज्यसेवा: उपजिल्हाधिकारी (DY. Collector), पोलीस उपअधीक्षक (DYSP), तहसीलदार, मुख्यधिकारी.
  • संयुक्त परीक्षा (Group B/C): PSI (पोलीस उपनिरीक्षक), STI (विक्रीकर निरीक्षक), ASO (कक्ष अधिकारी), कर सहाय्यक.

३. परीक्षेची काठिण्य पातळी

राज्यसेवेचा अभ्यासक्रम खूप विस्तृत आहे आणि आता तो UPSC च्या धर्तीवर वर्णनात्मक झाला आहे. दुसरीकडे, संयुक्त परीक्षा ही अधिक 'फॅक्चुअल' (Factual) असते आणि तिथे वेळेचे नियोजन (Time Management) अत्यंत महत्त्वाचे असते.

तुमच्यासाठी योग्य काय?

  • जर तुम्हाला लेखन कौशल्य चांगले असेल आणि मोठी पदे हवी असतील, तर राज्यसेवा निवडा.
  • जर तुम्हाला लवकर नोकरी हवी असेल आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचा (MCQs) सराव चांगला असेल, तर संयुक्त परीक्षा उत्तम पर्याय आहे.
पुढील भागात: "MPSC सविस्तर अभ्यासक्रम PDF कशी डाऊनलोड करावी?"

तयारीची खात्री करा!

या घटकावर आधारित अद्ययावत सराव परीक्षा द्या आणि तुमचा MPSC रँकिंग स्कोर वाढवा.

Peer Discussion Forum (0)

No questions logged on this thread yet. Be the first to start the chat!